बातम्या
शक्तीपीठाऐवजी जिल्ह्याच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी द्या – आमदार सतेज पाटील
By nisha patil - 8/26/2025 5:36:39 PM
Share This News:
शक्तीपीठाऐवजी जिल्ह्याच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी द्या – आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पांसाठी १६०८ कोटी रुपयांचा निधी प्रलंबित असून अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रस्तावित १६,६५३ कोटींच्या शक्तीपीठ महामार्गासाठी निधी खर्च करण्याऐवजी तो निधी जिल्ह्याच्या विकासासाठी द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पाटील यांनी शहरातील ड्रेनेज, वीज वितरण, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, पुणे-कोल्हापूर सहा पदरी महामार्गाजवळील रेल्वे मार्गाचा डीपीआर, तसेच कोल्हापूर पध्दतीचे १२२ बंधारे दुरुस्ती यासाठी तातडीने निधी मिळावा, असे नमूद केले आहे.
📌 प्रलंबित प्रकल्पांचा निधी (कोटींमध्ये)
-
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा – २९.२६
-
जोतिबा आराखडा – २५९
-
मलनि:स्सारण योजना – १०२.४६
-
नगरोत्थान – ४६.५९
-
नवीन प्रशासकीय इमारत – ८९.८४
-
सारथी इमारत – ११९.९४
शहरातील ४७८ कि.मी. रस्ते खराब झाले असून त्यासोबतच १५५ कि.मी. रस्त्यांसाठी निधी द्यावा, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
शक्तीपीठाऐवजी जिल्ह्याच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी द्या – आमदार सतेज पाटील
|