बातम्या
कोल्हापूर शहर-उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला सत्ता द्या – खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 11/8/2025 4:17:14 PM
Share This News:
कोल्हापूर शहर-उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला सत्ता द्या – खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जनतेने आगामी महापालिका निवडणुकीत भाजप व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
आमदार अमल महाडिक यांच्या १५ लाखांच्या विकास निधीतून, तसेच भाजप मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या हस्तीनापूर नगरी येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी महिलांनी औक्षण करून खासदारांचे स्वागत केले.
खासदार महाडिक म्हणाले, “शहर आणि उपनगरांचा सर्वांगीण विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रात भाजप व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे विकासासाठी भरीव निधी उपलब्ध आहे.”
त्यांनी कॉंग्रेसवर सडक, बिजली, पाणी या जुन्या घोषणांचा उल्लेख करून टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. आय.आर.बी. टोल रद्द करण्यासाठी ४५० कोटींचा निधी, तसेच सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात १५ शासकीय कार्यालये स्थापन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष निवास ताम्हणकर, विविध मान्यवर, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहर-उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला सत्ता द्या – खासदार धनंजय महाडिक
|