बातम्या
“शेंडा पार्क मेडिकल प्रकल्पाला वेग द्या” – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
By nisha patil - 1/8/2025 4:41:21 PM
Share This News:
“शेंडा पार्क मेडिकल प्रकल्पाला वेग द्या” – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. १ : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामे जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
शेंडा पार्क परिसरातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांचा तसेच सीपीआरच्या इमारतींच्या नुतनीकरण व दुरुस्ती कामांचा आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेतली जाईल आणि रुग्णसेवा खंडित होणार नाही याची दक्षता घेऊन कामांची गती वाढवावी.
✅ प्रमुख मुद्दे –
🔸 सीपीआरमधील रुग्णांचे स्थलांतर सुयोग्य पद्धतीने करा:
कामे पूर्ण होईपर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे.
🔸 सोलर पॅनल बसविण्याचे नियोजन:
शासकीय पातळीवर सोलर प्रकल्पासाठी प्रयत्न सुरु आहेत; लवकरच यासंबंधी निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.
🔸 सीपीआर परिसरातील पायाभूत सुविधा दर्जेदार करा:
रस्ते, गटारे, फूटपाथ यासह संपूर्ण परिसराचे रूपांतर गुणवत्तापूर्ण रचनांमध्ये होईल यासाठी जबाबदारीने काम करा.
🏥 बैठकीस उपस्थित अधिकारी –
बैठकीस संबंधित महाविद्यालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.
राजर्षी शाहू मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी सांगितले की, रुग्णांचे स्थलांतर सुरु असून पर्यायी जागेचा वापर होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी कामांची सद्यस्थिती स्पष्ट केली.
माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. वीणा पाटील, डॉ. भाग्यश्री खोत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
“शेंडा पार्क मेडिकल प्रकल्पाला वेग द्या” – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
|