बातम्या

नरसापूर व कोल्हापूर जिल्हातील पुलाचीशिरोली येथील लैंगीक शोषण करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या- उपसभापती यशोदा पोवार

Give strict punishment to the criminals who committed sexual exploitation in Pulachishiroli of Nasrapur and Kolhapur districts


By nisha patil - 6/5/2026 11:39:50 AM
Share This News:



नरसापूर व कोल्हापूर जिल्हातील पुलाचीशिरोली येथील लैंगीक शोषण करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या- उपसभापती यशोदा पोवार

 

आजरा(हसन तकीलदार) - नरसापूर येथे तसेच पुलाची शिरोली येथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाराधमांना कठोर शिक्षा द्यावी यासाठी राज्याचे मुख्य व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून मागणी करणात आली आहे. हे निवेदन तहसीलदार समीर माने यांना पंचायत समितीच्या उपसभापती यशोदा पोवार यांनी दिले.


निवेदनात म्हटले आहे की,पुणे येथील नसरापूर येथे एका ३ वर्षाच्या निष्पाप आणि निरागस चिमूरडीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून अमानुष आणि निर्दयीपणे खून केला ही घटना अत्यंत निंदनीय व लजास्पद आहे. त्याचप्रमाणे माणुसकीला काळिमा फासणारी आहे.त्याच बरोबर कोल्हापूर जिल्हातील पुलाची शिरोली येथे दोन तरूणांनी जवळ जवळ १० ते १५ तुरुणीवर लैंगीक अत्याचार करून त्यांचे व्हीडीओ मोबाईलवर व्हायरल केले आहेत. ही घटना सुद्धा निंदनिय व हिंदु धर्मातील मुलीवर अत्याचार करून धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. अशा घटना अलीकडे या पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार होत आहेत.

 

हे या छत्रपतींच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. यासाठी या दोन्ही घटनेंतील आरोपिंचा खटला फास्ट कोर्टात चालवून यांना लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणे करून पुन्हा या महाराष्ट्रातील मुली आणि महिलावर वाईट नजर टाकण्याची हिमंत या नराधमामध्ये होणार नाही त्याचप्रमाणे कायद्याचा धाकही राहील.यासाठी या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षेची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर पंचायत समितीच्या उपसभापती यशोदा पोवार यांची सही आहे.

 

 

 


नरसापूर व कोल्हापूर जिल्हातील पुलाचीशिरोली येथील लैंगीक शोषण करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या- उपसभापती यशोदा पोवार
Total Views: 74