बातम्या
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्हाला पाणी सोडा -दीडबाग कॉलनीतील महिलांची मागणी
By Administrator - 2/19/2026 3:05:47 PM
Share This News:
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्हाला पाणी सोडा -दीडबाग कॉलनीतील महिलांची मागणी
आजरा(हसन तकीलदार ):-आजरा नगरपंचायतीच्या नवीन पाईप लाईनचे काम सुरु असल्याने सद्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.काही गल्ल्यातून रात्री अपरात्री पाणी येत असल्याने लोकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येताना दिसत आहेत. दीडबाग कॉलनीतही अशीच काही अवस्था झाली आहे. सकाळी 5:00वा. येणारे पाणी आता कधी सायंकाळी तर कधी दुपारी तर कधी सकाळी येत असल्याचे तेथील महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे महिलांची तारांबळ उडत आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे सकाळी 5:00वाजता पाणी सोडावे अशी मागणी करीत नूतन नगरसेविका श्रीमती कलावती कांबळे यांचेकडे येथील महिलांनी निवेदन दिले.
सद्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. सायंकाळी 6:45वाजता रोजा इफ्तार करण्याची वेळ आहे आणि याच वेळेला दीडबाग कॉलनीतील पाणी सोडण्याची नवीन वेळ निर्धारित केल्याचे समजल्यानंतर येथील महिलांनी सकाळी 5:00वाजता पूर्ववत पाणी सोडण्यासाठी निवेदन देण्यासाठी सायंकाळी 5:00वाजता नगरपंचायत गाठली परंतु वेळ झाल्याने तेथे कोणतेही अधिकारी उपलब्ध न झाल्याने या महिलांनी त्या प्रभागाच्या नूतन नगरसेविका श्रीमती कलावती कांबळे यांना भेटून आपली व्यथा मांडली आणि आपले निवेदन त्यांना दिले. श्रीमती कांबळे यांनी निवेदन नगरपंचायतीपर्यंत पोहचवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आफरीन लमतुरे, आसमा लमतुरे, नाजरीन लमतुरे, सबिया लमतुरे, शकेला तकीलदार, यास्मिन खेडेकर, फिझा खेडेकर, बेगमबी दीडबाग, रेश्मा दीडबाग, आयेशा दीडबाग, राहमतबी माणगावकर, आशिया लमतुरे यांच्यासह कॉलनीतील महिलावर्ग उपस्थित होत्या.
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्हाला पाणी सोडा -दीडबाग कॉलनीतील महिलांची मागणी
|