शैक्षणिक

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मान

Glory to the work of the university on its 20th foundation day


By nisha patil - 6/9/2025 11:10:43 AM
Share This News:



डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून
 डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मान

 विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी कार्याचा गौरव 


कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रा. डॉ. तुळसिदास मोरे आणि प्रा. डॉ. रवींद्र महादेव शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यापीठाच्या वतीने 'डॉ. डी. वाय. पाटील बेस्ट टीचर अवॉर्ड’ ने कुलपती डॉ. संजय डी. पाटील व मान्यवरांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला.यावेळी  राजेश मनोहर देशपांडे, मनीषा श्रीकांत टाकळकर, संभाजी रामचंद्र जाधव आणि गजानन आनंदराव भाट यांना‘सौ. शांतादेवी डी. पाटील बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड’ ने  सन्मानित करण्यात आले. 
 
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० वा स्थापना दिनी हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार  सभागृहात झालेल्या या सोहळ्याला लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना  ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव पुरस्कार’ने  सन्मानित करण्यात आले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, लेफ्टनंट जनरल गोयल, मिलिंद काळे, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले यांच्याहस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यापीठातील विविध परीक्षामध्ये गुणवंत ठरलेल्या ३१ विद्यार्थी, एन.एस.एसचे ८ व एनसीसी चे २  विद्यार्थी,  क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या विविध संस्थांचे प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 डॉ. रवींद्र शिंदे यांचा सन्मान करताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत लेफ्टनंट जनरल भूपेश के गोयल,  मिलिंद काळे, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ व्ही.व्ही भोसले.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मान
Total Views: 187