बातम्या

Gokul milk....गोकुळच्या दुधाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची पसंती!

Goa Chief Minister prefers Gokul milk


By Administrator - 4/7/2025 12:01:43 PM
Share This News:



गोकुळच्या दुधाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची पसंती!

 गोव्यात शाळांमध्ये गोकुळचं दूध? सकारात्मक संकेत 

गोव्यातील नागरिक आणि पर्यटक लवकरच ‘गोकुळ’च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांचा अधिक चांगला लाभ घेणार आहेत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ आणि संचालक मंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन गोवा मिल्क फेडरेशनच्या सहकार्याने एक सामंजस्य योजना आखण्याची दिशा ठरवली.

गोकुळचे उत्पादने गुणवत्तेत अव्वल असल्याने शाळांतील मध्यान्ह भोजन योजनेत दूधाचा समावेश, थेट ग्राहकांना दूध पोहोचवणं, आणि कर सवलतीबाबतही चर्चा झाली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

गोव्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, गोकुळसारख्या विश्वासार्ह संस्थेच्या माध्यमातून नियमित, दर्जेदार आणि स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दोन्ही पक्षांनी दिले.


Gokul milk...गोकुळच्या दुधाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची पसंती!
Total Views: 130