बातम्या

आजऱ्यात गोवा बनावट दारूची वाहतूक पकडली; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Goa fake liquor traffic caught in Ajra


By nisha patil - 11/24/2026 6:30:24 PM
Share This News:



आजऱ्यात गोवा बनावट दारूची वाहतूक पकडली; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या तस्करावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत ३८ बॉक्स गोवा बनावट विदेशी मद्यासह चारचाकी असा एकूण ९ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ नोव्हेंबर रोजी सुळेरान गावच्या हद्दीत आंबोली-आजरा मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज पथकाने सापळा रचला होता. यावेळी एका चारचाकीतून गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

पथकाने वाहनाची तपासणी केली असता विविध ब्रँडचे ३८ बॉक्स मद्य मिळून आले. याची किंमत ३ लाख १ हजार २०० रुपये, तर वाहनाची किंमत ६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील दिपेश उमेश सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक प्रमोद खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.


आजऱ्यात गोवा बनावट दारूची वाहतूक पकडली; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
Total Views: 5