विशेष बातम्या
गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा जेरबंद; ७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 6/19/2025 7:04:05 PM
Share This News:
गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा जेरबंद; ७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर – मोटनवाडी फाटा ते पाटणे फाटा जंगम हट्टी मार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. स्विफ्ट कारमधून ही दारू वाहून नेली जात होती.याची माहिती आज गुरुवारी दि. १९ जून दुपारी एकच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
या प्रकरणात कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील किनये बहादुरवाडी येथील लक्ष्मण सातेरी पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या मद्यासह एकूण ७ लाख ३४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आणि वापरण्यात आलेली स्विफ्ट कार यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा जेरबंद; ७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
|