बातम्या

गोव्याच्या मद्याची कोल्हापुरात तस्करी; ९ बॉक्ससह दोघांना अटक

Goan liquor smuggled into Kolhapur


By nisha patil - 9/23/2026 4:45:54 PM
Share This News:



गोव्याच्या मद्याची कोल्हापुरात तस्करी; ९ बॉक्ससह दोघांना अटक

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चारचाकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. संभाजीनगर ते हॉकी स्टेडियम रोडवरील निर्माण चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, मद्याच्या ९ बॉक्ससह एकूण ७ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निल दत्तात्रय तांबट (वय ३५, रा. राजाराम चौक, कोल्हापूर) आणि अभिजीत किरण पोवार (वय ३९, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्ल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडच्या सिलबंद विदेशी मद्याच्या बाटल्यांचे ९ बॉक्स जप्त करण्यात आले. या मद्याची अंदाजे किंमत ९७ हजार ५०० रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत अंदाजे ७ लाख रुपये आहे.

या प्रकरणी निल तांबट आणि अभिजित पोवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.


गोव्याच्या मद्याची कोल्हापुरात तस्करी; ९ बॉक्ससह दोघांना अटक
Total Views: 13