मनोरंजन
आजरा शहरात दुर्गामातेचं जल्लोषात स्वागत
By nisha patil - 9/23/2025 11:10:10 AM
Share This News:
आजरा :- (हसन तकीलदार) पावसाने उघडीप दिल्यानंतर आजरा शहरासह तालुक्यात दुर्गामातेच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळाला. घराघरांत घटस्थापना उत्साहात पार पडली असून सार्वजनिक दुर्गामाता मंडळांनी भव्य मिरवणुका काढून देवीचे स्वागत केले.
आजरा शहरात डॉल्बीच्या गजरात, लेझीम पथकं, पारंपारिक वाद्ये, सजीव देखावे आणि आतषबाजीच्या रोषणाईत संपूर्ण वातावरण दणक्यात रंगून गेले होते. मिरवणुकांदरम्यान ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
क्रांतिकारी नवरात्रोत्सव मंडळ, छत्रपती शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, लायन्स किंग नवरात्रोत्सव मंडळ, भगवा रक्षक मंडळ, धर्मवीर नवरात्रोत्सव मंडळ (गांधीनगर) आदी मंडळांनी नेटके आयोजन करून दुर्गामातेचे स्वागत केले.
आगमन मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकींचा जल्लोष सुरू होता.
आजरा शहरात दुर्गामातेचं जल्लोषात स्वागत
|