बातम्या

‘आचार्य अत्रे’ पत्रकारिता पुरस्काराने गोकुळतर्फे पत्रकारांचा सन्मान

Gokul  achary atre


By nisha patil - 6/30/2025 7:16:15 PM
Share This News:



‘आचार्य अत्रे’ पत्रकारिता पुरस्काराने गोकुळतर्फे पत्रकारांचा सन्मान

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)तर्फे ‘आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ प्राप्त पत्रकारांचा सत्कार समारंभ गोकुळ शिरगाव येथे पार पडला. चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त ११ पत्रकारांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

मुश्रीफ यांनी पत्रकारांचे समाजप्रबोधनातील योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. ग्रामीण समस्या, शेतकरी प्रश्न आणि सहकार क्षेत्रातील मुद्दे प्रभावीपणे मांडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान म्हणजे गोकुळची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांनीही गोकुळच्या या उपक्रमाचे कौतुक करत सहकार क्षेत्रात सकारात्मक भूमिका ठेवण्याची ग्वाही दिली.
 

या कार्यक्रमाला गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘आचार्य अत्रे’ पत्रकारिता पुरस्काराने गोकुळतर्फे पत्रकारांचा सन्मान
Total Views: 108