बातम्या
गोकुळची उत्पादकांप्रती बांधिलकी : विकास योजनांवर तब्बल ४२ कोटींचा खर्च
By nisha patil - 9/30/2025 3:27:18 PM
Share This News:
गोकुळची उत्पादकांप्रती बांधिलकी : विकास योजनांवर तब्बल ४२ कोटींचा खर्च
कोल्हापूर: गोकुळने केवळ दर फरकापुरते मर्यादित न राहता उत्पादकांच्या विकासासाठी विविध उपयुक्त योजनांवर सुमारे ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये पशू उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, किसान विमा, वासरू संगोपन, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
सन २०२४-२५ मध्ये गोकुळने प्रतिदिन १८.५९ लाख लिटर दूध संकलन, तर दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी २३.६३ लाख लिटर विक्री या उच्चांकांना गवसणी घातली. संस्थेची उलाढाल तब्बल ३,९६६ कोटी रुपये झाली आहे.
भविष्यातील योजनांतून गोकुळने आईस्क्रिम, चीज, गुलाबजाम, बासुंदीचे नवे प्रकार, दही प्रोजेक्ट, सी.एन.जी. पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, उच्च दर्जाचे चारा व जनावरांसाठी खास खाद्य यांसारखे अनेक उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संचालक मंडळ व व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे गोकुळने प्रगतीची नवी शिखरे गाठली असून, उत्पादकांना अधिक दर देण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढील काळात दररोज २५ लाख लिटर संकलन गाठण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
गोकुळची उत्पादकांप्रती बांधिलकी : विकास योजनांवर तब्बल ४२ कोटींचा खर्च
|