राजकीय

जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळचा सामाजिक उपक्रम; सीपीआरमध्ये रुग्णांना मोफत फ्लेव्हर मिल्क वाटप

Gokul Distributes Free Flavoured Milk to Patients at CPR Hospital on World Milk Day


By nisha patil - 1/6/2026 1:44:21 PM
Share This News:



कोल्हापूर : जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला मोफत ‘गोकुळ फ्लेव्हर मिल्क’चे वाटप करण्यात आले.

गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते हा सामाजिक उपक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील यांच्यासह गोकुळ व रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक दुग्ध दिनानिमित्त दरवर्षी दुधाच्या पोषणमूल्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळकडून विविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत केले. तसेच सागर बलकवडे यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक आणि हितचिंतकांना जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


कुळची सामाजिक बांधिलकी; जागतिक दुग्ध दिनी रुग्णांना दिला पोषणाचा आधार
Total Views: 11