बातम्या
गोकुळ दूध संघाला 113 कोटींचा विक्रमी नफा; आमदार सतीश पाटील यांच्याकडून संचालक मंडळाचं कौतुक
By Administrator - 11/4/2025 5:09:02 PM
Share This News:
गोकुळ दूध संघाला 113 कोटींचा विक्रमी नफा; आमदार सतीश पाटील यांच्याकडून संचालक मंडळाचं कौतुक
कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा आधारस्तंभ असलेल्या गोकुळ दूध संघाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तब्बल 113 कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. गोकुळच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा नफा झाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अध्यक्ष अरुण डोंगळे सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
गोकुळच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुश्री पाणी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी हा नफा कसा साध्य झाला याची माहिती नेत्यांना दिली. त्यांनी सांगितले की, प्रचंड स्पर्धेच्या वातावरणातही गोकुळने बाजारपेठेवरील आपली पकड कायम ठेवली.
कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी यावेळी गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंदातील महत्त्वाच्या बाबी तसेच दूध संकलन व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. काटकसरीने व नियोजनबद्ध कारभारामुळे शेतकऱ्यांना अधिक दर देणे शक्य झाले असून नफा वाढवता आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
गोकुळ दूध संघाला 113 कोटींचा विक्रमी नफा; आमदार सतीश पाटील यांच्याकडून संचालक मंडळाचं कौतुक
|