बातम्या

गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांशी सदिच्छा भेट

Gokul Dudh Sanghs new president meets CM


By nisha patil - 12/6/2025 8:49:27 PM
Share This News:



गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांशी सदिच्छा भेट

कोल्हापूर:१२ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) चे नुतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी बुधवार दिनांक ११\०६\२०२५ इ .रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवाराच्यावतीने उपमुख्यमंत्री नाम. एकनाथजी शिंदे व दुग्ध विकासमंत्री नाम.अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांची व प्रलंबित विषयांची माहिती दिली.

यावेळी गोकुळ दूध संघाच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प,स्लरी प्रकल्प ,वासरू संगोपन योजना , मुंबई,पुणे डेअरी विस्तार तसेच मुंबई येथील प्रलंबित भूखंडासंदर्भातील विषययावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबईसारख्या महानगरात गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तेच्या माध्यमातून गोकुळने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला असून हा विश्वास कायम राखून संस्था अधिक ग्राहकाभिमुख व्हावी आणि बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करावे.” असे मनोगत व्यक्त केले दुग्धविकास मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गोकुळसारख्या नामांकित संस्थेला प्रलंबित विषयांवर शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”असे सांगितले तसेच यावेळी दुग्ध विकास मंत्री यांना गोकुळ भेटीचे निमंत्रण देण्यात आले. . यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ,आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर नाम. प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नविद मुश्रीफ,माजी चेअरमन ज्येष्ठ् संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे ,अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील,अंबरिषसिंह घाटगे,बाळासो खाडे, युवराज पाटील,मुरलीधर जाधव,कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.


गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांशी सदिच्छा भेट
Total Views: 112