विशेष बातम्या
गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सभा उत्साहात
By nisha patil - 11/8/2025 3:30:08 PM
Share This News:
गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सभा उत्साहात
सभासदांना ८% लाभांश; महत्त्वाचे ठराव मंजूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूरची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. संस्थेचे वसूल भांडवल ₹२६ कोटी २७ लाख, ठेवी ₹५७ कोटी ८० लाख, कर्ज वितरण ₹९२ कोटी ३ लाख, वार्षिक उलाढाल ₹१७२ कोटी ८१ लाख तर चालू नफा ₹३४ लाख १५ हजार इतका झाल्याचा अहवाल सभेत सादर करण्यात आला. सभासदांना ८% लाभांश जाहीर करण्यात आला.
सभेत सुवर्ण महोत्सव निधी तरतूद, सभासदांसाठी ऐच्छिक विमा योजना, इमारत दुरुस्ती-सुधारणा आणि गोकुळ दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र सुरू करण्यासह विविध महत्त्वाचे ठराव मंजूर झाले. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या कर्मचारी व सभासदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व अहवाल वाचन सचिव संभाजी माळकर यांनी केले तर आभार माजी चेअरमन राजेंद्र चौगले यांनी मानले.
गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सभा उत्साहात
|