बातम्या

गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ; ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण रविवारी

Gokul Ice Cream launched on Gokuls 63rd anniversary


By Administrator - 3/14/2026 1:45:29 PM
Share This News:



गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ; ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण रविवारी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ‘गोकुळ आईस्क्रीम’ या नव्या उत्पादनाचा शुभारंभ तसेच ‘गोकुळ श्री’ पुरस्कार आणि विविध बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

हा कार्यक्रम रविवार (दि. १५ मार्च २०२६) रोजी सकाळी १०.३० वाजता गोकुळ प्रकल्प एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील आमदार, मान्यवर, संघाचे चेअरमन, संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित राहणार असून ‘गोकुळ आईस्क्रीम’ या नव्या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सदस्यांचा ‘गोकुळ श्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ; ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण रविवारी
Total Views: 8