बातम्या
गोकुळ दूध संघाचा ऐतिहासिक निर्णय! दूध उत्पादकांना मिळणार १३६ कोटींचा उच्चांकी अंतिम दर फरक – अरुण डोंगळे
By nisha patil - 4/16/2025 9:28:45 PM
Share This News:
गोकुळ दूध संघाचा ऐतिहासिक निर्णय! दूध उत्पादकांना मिळणार १३६ कोटींचा उच्चांकी अंतिम दर फरक – अरुण डोंगळे
कोल्हापूर, गोकुळ दूध संघ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना रु. १३६.०३ कोटींचा अंतिम दूध दर फरक वितरित केला जाणार आहे, अशी माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
हा दर फरक गतवर्षीपेक्षा २२.३७ कोटींनी अधिक असून, यामध्ये खालील रक्कम समाविष्ट आहे:
🔸 अंतिम दर फरक, व्याज, डिव्हिडंड इ. – ₹124.39 कोटी
🔸 प्रति लिटर २० पैसे जादा रक्कम – ₹11.64 कोटी
🔸 मोफत फर्टीमिन प्लस पशुखाद्य – ₹7.10 कोटी (4.73 लाख बॅग्ज)
🔸 कर्मचाऱ्यांना २% जादा बोनस – ₹1.83 कोटी
➡️ आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये दूध उत्पादकांना मिळणारा अंतिम सरासरी दर:
▪️ म्हैस दूध – ₹60.48 प्रति लिटर
▪️ गाय दूध – ₹36.84 प्रति लिटर
➡️ रमजान ईद निमित्त विक्रमी दूध विक्री – 23.63 लाख लिटर/दिवस
➡️ संघाची सध्याची दूध संकलन क्षमता – 18.58 लाख लिटर
स्व. आनंदराव पाटील–चुयेकर म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रम, सौरऊर्जा प्रकल्प व जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना यांचा प्रभावी लाभ दूध उत्पादन वाढीसाठी होत आहे.
राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू असून, भविष्यातही दूध उत्पादकांच्या सहकार्याने अधिक प्रगती साधणार असल्याचा विश्वास डोंगळे यांनी व्यक्त केला.
गोकुळ दूध संघाचा ऐतिहासिक निर्णय! दूध उत्पादकांना मिळणार १३६ कोटींचा उच्चांकी अंतिम दर फरक – अरुण डोंगळे
|