विशेष बातम्या
गोकुळला केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
By nisha patil - 7/17/2025 7:13:46 PM
Share This News:
गोकुळला केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
आरोग्य, सहकार आणि युवक विकासासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा – केंद्रीय मंत्री मोहोळ
गोकुळसारख्या संस्थांचे सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्या संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
बालेवाडी, पुणे येथे झालेल्या स्व. शंकरराव साळवी चषक पुणे लिग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
मोहोळ यांनी दूध, आरोग्य आणि खेळ यातील नातं अधोरेखित करत युवक व क्रीडापटूंनी नियमित दूध सेवन करण्याचे आवाहन केले.
मुश्रीफ यांनी गोकुळचा महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून उल्लेख करत खेळाडूंना पोषक व दर्जेदार दुग्धजन्य उत्पादन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमात क्रीडाक्षेत्रातील व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते.
गोकुळला केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
|