बातम्या
गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार
By nisha patil - 10/29/2025 12:09:10 AM
Share This News:
‘गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार
सहकार धोरण समितीवर डॉ. चेतन नरके — गोकुळकडून सत्कार
डॉ. नरके : “हा सन्मान संपूर्ण सहकार क्षेत्राचा आहे”
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गोकुळ शिरगाव प्रकल्प येथे झाला.
या वेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “राज्याच्या सहकार धोरण समितीवर डॉ. नरके यांची नियुक्ती होणे हे गोकुळ परिवारासाठी अभिमानास्पद आहे.” त्यांनी डॉ. नरके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला प्रतिसाद देताना डॉ. चेतन नरके म्हणाले, “हा सन्मान माझा नव्हे, तर संपूर्ण सहकार क्षेत्राचा आहे. सहकार क्षेत्रात अधिक परिणामकारकपणे काम करण्याची संधी मला मिळाली आहे, आणि मी प्रत्येक सदस्यासाठी कटिबद्ध आहे.”
यावेळी गोकुळ दूध संघाने अलीकडेच केलेल्या दूध दरवाढीचा, संस्था व सचिव कमिशन वाढीचा आणि महालक्ष्मी पशुखाद्य दरकपातीचा उल्लेख करून गोकुळ संचालक मंडळाचा कर्मचारी संघटनेतर्फेही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आणि गोकुळचे अधिकारी–कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार
|