बातम्या
गोकुळकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दर – आमदार सतेज पाटील
By nisha patil - 8/18/2025 5:40:44 PM
Share This News:
गोकुळकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दर – आमदार सतेज पाटील
शेतकऱ्यांसाठी म्हैस खरेदीवर ₹५० हजार अनुदान; विविध योजना जाहीर
गोकुळ संघाशी संलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा पुईखडी येथे आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी त्यांनी “गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याची भूमिका घेतली असून म्हैशीसाठी ₹१२ व गायीसाठी ₹६ दरवाढ केली आहे. तसेच म्हैस खरेदीसाठी ₹५० हजारांचे अनुदान सुरू केले आहे,” असे सांगितले.
चेअरमन नविद मुश्रीफ यांनी म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वासरू संगोपन अनुदान, प्रेग्नन्सी रेशन व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सभेत शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा होऊन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
गोकुळकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दर – आमदार सतेज पाटील
|