बातम्या

गोकुळच्या प्रक्रियेला पूर्णविराम देऊनच मोसमी चौगुले स्वीकारणार नवी जबाबदारी!

Gokul12


By nisha patil - 1/11/2026 2:31:23 PM
Share This News:



गोकुळच्या प्रक्रियेला पूर्णविराम देऊनच मोसमी चौगुले स्वीकारणार नवी जबाबदारी!

कोल्हापूरच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या मोसमी चौगुले यांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. मात्र, या बदलीमागची वस्तुस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता मोसमी चौगुले यांची बदली ही कोणत्याही राजकीय दबावातून किंवा गोकुळमधील घडामोडींमुळे झालेली नसून, नियमित प्रशासकीय प्रक्रियेनुसार पदोन्नतीच्या माध्यमातून झालेली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी येणार आहे.

मात्र, कोल्हापुरातील महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदारीकडेही त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्या आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याची भूमिका आहे.

विशेष म्हणजे, गोकुळमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीकडे राजकीय चष्म्यातून पाहण्यापेक्षा ती नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल.

पदोन्नतीची नवी जबाबदारी आणि गोकुळच्या प्रक्रियेप्रती प्रशासकीय बांधिलकी... मोसमी चौगुले यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


गोकुळच्या प्रक्रियेला पूर्णविराम देऊनच मोसमी चौगुले स्वीकारणार नवी जबाबदारी!
Total Views: 34