बातम्या
गोकुळची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/9/2025 11:34:21 AM
Share This News:
कोल्हापूर-: गोकुळ’ दूध संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेत संघाच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर करताना २०२४-२५ मध्ये उलाढाल ३,९६६ कोटींवर पोहोचल्याचे जाहीर झाले. दूध संकलनात ८.४२% वाढ झाली असून, राज्यातील सर्वाधिक दूध दर देणारा संघ म्हणून गोकुळची ओळख अधोरेखित झाली.
सभेत दूध दरफरक, डिबेंचर व्याज, डिव्हिडंड आदी स्वरूपात १३६ कोटींचे वाटप दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोटनियम दुरुस्ती, मुंबई-पुण्यातील जागा खरेदी, बटर मेकिंग व पेढा प्रोजेक्ट, वासरू संगोपन केंद्र, सीएनजी पंप, आईस्क्रिम–चीज उत्पादन यांसह भविष्यातील विविध योजना बहुमताने मंजूर झाल्या.
गोकुळची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न...
|