विशेष बातम्या

‘गोकुळ’ची ‘गोबरसे समृद्धी’ योजना गतिमान — आणखी ५ हजार बायोगॅस युनिट्स मंजूर

Gokuls Gobarse Samruddhi


By nisha patil - 7/11/2025 3:34:28 PM
Share This News:



‘गोकुळ’ची ‘गोबरसे समृद्धी’ योजना गतिमान — आणखी ५ हजार बायोगॅस युनिट्स मंजूर

ऊर्जा स्वावलंबन आणि बचतीचा नवा मार्ग — नविद मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), एन.डी.डी.बी. मृदा आणि सिस्टीमा बायो यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘गोबरसे समृद्धी’ बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून २०२५-२६ साठी ५ हजार नवीन बायोगॅस युनिट्स मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

गेल्या दोन टप्प्यांमध्ये ७,२०० कुटुंबांपर्यंत बायोगॅस पोहोचवला गेला असून, २४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे. या योजनेमुळे महिलांना स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध होऊन वार्षिक १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत आहे.

नव्या टप्प्यात बायोगॅस युनिटमध्ये आधुनिक साधने आणि सेफ्टी फीचर्स जोडले गेले आहेत. अनुदानानंतर उत्पादकांना केवळ ९,३६६ रुपये भरणे आवश्यक राहील.
“ही योजना केवळ ऊर्जा निर्मिती नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे,” असे मुश्रीफ यांनी सांगितले.


‘गोकुळ’ची ‘गोबरसे समृद्धी’ योजना गतिमान — आणखी ५ हजार बायोगॅस युनिट्स मंजूर
Total Views: 75