कृषी
शेतकऱ्यांच्या विश्वासावर गोकुळची भरारी
By nisha patil - 8/9/2025 12:58:56 PM
Share This News:
शेतकऱ्यांच्या विश्वासावर गोकुळची भरारी – ६३ वी वार्षिक सभा ९ सप्टेंबरला
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यंदा ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ९ सप्टेंबर रोजी घेणार आहे. संघाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ५० हजार रुपये, इमारत अनुदानात वाढ, वासरू संगोपन योजना बळकट करणे अशा महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे.
यंदा ‘युवा दूध उत्पादक वर्ष’ साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दुग्धव्यवसायाकडे तरुणांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. गोकुळने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुग्धजन्य उत्पादनांची विक्री वाढवण्याचे नियोजन केले आहे.
चेअरमन नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांच्या विश्वासावरच गोकुळची भरारी सुरू आहे. उत्पादकांचे प्रश्न सोडवून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा संघाचा ध्यास आहे.”
शेतकऱ्यांच्या विश्वासावर गोकुळची भरारी
|