विशेष बातम्या

म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवणार – नविद मुश्रीफ

Gokuls plans to increase buffalo milk


By nisha patil - 6/14/2025 10:23:12 PM
Share This News:



म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवणार – नविद मुश्रीफ

कोल्हापूर (ता.१४) : गोकुळ दूध संघात तालुकानिहाय आढावा बैठकीत चेअरमन नविद मुश्रीफ यांनी म्हैस दूध संकलन वाढीसाठी संघाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे व्यवस्थापन व दर्जेदार पशुखाद्य वापरावर भर देण्याचे आवाहन केले.

गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना व फर्टीमीन प्लस, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उपचार या योजनांचा प्रभाव वाढवून जिल्ह्यात व सीमाभागातील दूध संकलन वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

बैठकीस माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Gokuls plan :म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवणार – नविद मुश्रीफ
Total Views: 108