बातम्या

सोने-चांदीचे भाव नवे शिखर गाठले

Gold and silver prices hit new highs


By nisha patil - 10/9/2025 4:49:19 PM
Share This News:



 सोने-चांदीचे भाव नवे शिखर गाठले

सोने आणि चांदीचे भाव सतत वाढत असून त्यांनी पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. वायदा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांवर पोहोचला आहे.

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव तब्बल ५०८० रुपयांनी वाढून १ लाख १२ हजारांवर गेला आहे. तर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार बुधवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०९,४७५ रुपये झाला आहे. चांदीचा भाव प्रति किलो १,२४,७७० रुपये झाला आहे.

सरकारने १ जुलै २०२१ पासून हॉलमार्किंग अनिवार्य केली आहे. हॉलमार्क दागिन्यांवर BIS लोगो, शुद्धतेचा दर्जा आणि ६ अंकी HUID कोड असतो. २४ कॅरेट सोने शुद्ध मानले जाते, मात्र दागिने साधारणतः १८ ते २२ कॅरेटमध्ये बनवले जातात.

भारतातील सोन्याच्या भावावर जागतिक बाजारातील चढउतार, अमेरिकन डॉलरची किंमत, आयात खर्च, व्याजदर, आर्थिक स्थिरता, महागाई, मागणी-पुरवठा यांसारख्या घटकांचा थेट परिणाम होतो. मागणी वाढल्यास सोन्याचे दर झपाट्याने वाढतात आणि यंदा त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.


सोने-चांदीचे भाव नवे शिखर गाठले
Total Views: 78