बातम्या
सोन्याच्या दरात पुन्हा उसळी, एक लाखाचा टप्पा पार
By nisha patil - 7/5/2025 4:22:38 PM
Share This News:
सोन्याच्या दरात पुन्हा उसळी, एक लाखाचा टप्पा पार
एकाच दिवसात २२०० रुपयांची वाढ
चांदीही झपाट्याने वधारली – दरात १६०० रुपयांची वाढ
अक्षयतृतीयेनंतर सुरू झालेल्या घसरणीला ब्रेक लागून सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. अवघ्या एका दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल २२०० रुपयांची वाढ झाली असून, १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या वर पोहोचला आहे.
मंगळवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,00,300 रुपये झाला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली असून किलोमागे १६०० रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर ९९,२०० रुपये झाला.
तत्पूर्वी सोमवारी सोन्याचा दर ९८,१०० रुपये आणि चांदीचा दर ९७,६०० रुपये प्रति किलो इतका होता. जीएसटीशिवाय सोन्याचा दर सध्या ९७,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ९६,३१० रुपये प्रति किलो इतका आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा उसळी, एक लाखाचा टप्पा पार
|