बातम्या
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालिकांना सोन्याची अंगठी
By nisha patil - 9/18/2025 6:07:36 PM
Share This News:
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालिकांना सोन्याची अंगठी
खासदार धनंजय महाडिक यांचा उपक्रम; आशिष शेलारांचे कौतुक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात १६ सप्टेंबर रात्री १२ नंतर ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालिकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने सोन्याची अंगठी देण्यात आली.
सीपीआर रुग्णालयात जन्मलेल्या ९ बालिकांना अंगठ्या प्रदान करण्याचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ४२ बालिकांना सोन्याची अंगठी देण्यात आली.
➡️ “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
➡️ बालिकांच्या पालकांना चंदनाची दोन रोपे देखील देण्यात आली असून, ही रोपे १८ वर्षांनी सुमारे ५० लाख रुपये उत्पन्न देऊ शकतात, ज्यातून मुलींच्या शिक्षण व विवाहाचा खर्च भागवण्याचा हेतू आहे.
कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक म्हणाले की, “मोदीजींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालिकांचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी हा उपक्रम राबवला आहे.”
या उपक्रमाचं कौतुक करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “खासदार महाडिक यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, मुलींच्या भवितव्यासाठी प्रेरणादायी आहे.”
या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. गिरीष कांबळे, भाजप पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालिकांना सोन्याची अंगठी
|