बातम्या

*गवसे येथे घरफोडी करून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास*

Gold valuables and cash stolen in a house burglary at Gavse


By nisha patil - 10/20/2026 12:16:59 AM
Share This News:



*गवसे येथे घरफोडी करून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास*

आजरा(हसन तकीलदार)*:-गवसे ता. आजरा येथे घराची कौले काढून लोखंडी कपाटातील सोन्याचे 9•240 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्राचे लगड व रोख रक्कम 9 हजार 500 रुपये अज्ञात चोरट्यांने लंपास केले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 69हजार 500 रुपये इतकी आहे. शनिवार दि.17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 ते दि. 18 ऑक्टोबर सकाळी 7:00 वाजताच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार झाला असल्याचा अंदाज आहे.

याबाबतची फिर्याद सुयश प्रकाश पाटील रा. गवसे, गावठाण (ता. आजरा) व्यवसाय वनरक्षक यांनी आजरा पोलीसात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. प्रकाश पाटील हे पत्नीसह देवदर्शनाला गेले होते. त्यांच्या घरी आई होत्या. त्या भावाकडे रात्री गावात मुक्कामी राहील्या. घरात कोणी नसल्याची चोरट्यानी संधी साधली. घरामागील छप्परावर चढून कौले काढली. घरात उतरून लोखंडी कपाटाचे दार चावीने उघडले. कपाटातील रोख रक्कम व सोन्याची लगड पळवली आहे.
पोलीस हेड कॉंस्टेबल मसवेकर यांनी भेट देऊन माहिती घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली 
पोलीस हेड कॉंस्टेबल अनिल सरंबळे हे अधिक तपास करीत आहेत.


*गवसे येथे घरफोडी करून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास*
Total Views: 4