शैक्षणिक
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज विद्यार्थाना प्रवेश घेणेकरिता सुवर्ण संधी
By nisha patil - 8/20/2025 1:30:48 PM
Share This News:
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज ICHL मध्ये
विद्यार्थाना प्रवेश घेणेकरिता सुवर्ण संधी
कोल्हापूर दि. 19 : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित, भौतिक व मूलभूत सुविधाने सुसज्ज असलेल्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी हे शैक्षणिक वर्ष जून - २०२५-२६ पासून सुरु झाले आहे. सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया CET सेल मार्फत सुरु आहे. B.A. LL. B ५ वर्षीय अभ्यासक्रम साठी दि. २१-०८-२०२५ ते २३-०८-२०२५ व LL.B.-३ वर्षीय अभ्यासक्रमसाठी दि. २४-०८-२०२५ ते २७ -०८- २०२५ पासून ज्या विद्यार्थानी रजिस्ट्रेशन केले नाही किंवा ज्यांना आपल्या पसंती नुसार महाविद्यालय मिळाले नाही. अशा विद्यार्थी आणि विधार्थिनी करीता महाविद्यालयात विशेष नोंदणी व विध्यार्थी सेवा केंद्र सुरु केले आहे. तरी CET दिलेल्या पैकी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यानी वरील दिनांकास महाविद्यालयात भेट द्यावी. असे आवाहन दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. चंद्रानी बागडी यांनी केले आहे.
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज ICHL मध्ये विद्यार्थाना प्रवेश घेणेकरिता सुवर्ण संधी
|