बातम्या
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता : ऑगस्टचा हप्ता आजपासून खात्यात
By nisha patil - 11/9/2025 3:26:21 PM
Share This News:
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता : ऑगस्टचा हप्ता आजपासून खात्यात
"माझी लाडकी बहीण" योजनेचा सन्मान निधी लाभार्थ्यांना मिळणार – आदिती तटकरे
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरित होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा होईल. "माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता : ऑगस्टचा हप्ता आजपासून खात्यात
|