बातम्या

आनंदराव आबिटकर पॉलिटेक्निकला 'गुड' मानांकन

Good rating for Anandrao Abitkar Polytechnic


By Administrator - 8/7/2026 7:58:35 PM
Share This News:



आनंदराव आबिटकर पॉलिटेक्निकला 'गुड' मानांकन

गारगोटी प्रतिनिधी, पाल (ता.भुदरगड) येथील श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) ला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने बाह्य शैक्षणिक आवेक्षणामधील सर्वोत्तम कार्याची दखल घेत राज्य पातळीवर गुड मानांकन जाहीर केले. या मानांकनामुळे पॉलिटेक्निकची तंत्र शिक्षण विभागातील दर्जेदार गुणवत्ता सिद्ध झाली आहे. राज्य पातळीवरील हे यश उज्ज्वल शैक्षणिक परंपरा अधोरेखित करणारे ठरले आहे.

गेल्याच वर्षी सुरू झालेल्या या महाविद्यालयाने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक कौशल्य विकसित होण्यासाठी प्राधान्य दिले आहे. अभ्यास दौरे, औद्योगिक प्रशिक्षणावर भर व त्यातून उद्योग संवाद घडविला जातो. प्रात्यक्षिक शिक्षणाला आधुनिक प्रयोगशाळेची उपलब्धता करून तांत्रिक पद्धतीच्या सखोल अभ्यासाचे उत्तम नियोजन, अध्ययन व अध्यापन पद्धतीतील सूक्ष्म नियोजन, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाची जोपासना, सर्वोत्तम निकालाची परंपरा याची पाहणी करून हे मानांकन प्राप्त झाले आहे.

गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देणाऱ्या राज्य पातळीवरील पॉलिटेक्निकमध्ये आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पॉलिटेक्नची नोंद झाली आहे. दर्जेदार तांत्रिक शिक्षणाची चळवळ यापुढेही गतिमान करण्यास पॉलिटेक्निक कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्राचार्य डॉ.उमेश पाटील व पॉलीटेक्नीक कॉडीनेटर प्रा.कविता कुरळे यांनी दिली. 
 
दरम्यान, पॉलिटेक्निकने आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, मूल्याधिष्ठित शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले आहे. जागतिक पातळीवरील शैक्षणिक दर्जा विकसित केला आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकचा नावलौकिक झाला आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर यांनी यांनी दिली.


आनंदराव आबिटकर पॉलिटेक्निकला 'गुड' मानांकन
Total Views: 18