राशिभविष्य
महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 10/6/2025 9:44:33 PM
Share This News:
महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्यसेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयक इतर सेवेमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका येथे सदरचा कार्यक्रम पार पडला. या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडीक व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
महापालिकेच्यावतीने शहरात यापुर्वी दहा व आता नवीन पाच आयुष्मान आरोग्य मंदिरे सुरु करण्यात आली आहेत. ही नविन आरोग्य मंदिरे केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तयार करण्यात आली आहेत. ही आरोग्य मंदिरे कावळा नाका, टाकाळा निगडे हॉल, राजारामपुरी संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, सिध्दार्थनगर व साकोली कॉर्नर या ठिकाणी आजपासून सुरु करण्यात आली आहेत.
महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|