राजकीय
ईश्वरपूर (इस्लामपूर) च्या अशोक पाटील यांची सद्भावना भेट.
By nisha patil - 4/11/2025 11:31:54 AM
Share This News:
सांगली:- सांगली जिल्ह्यातील डॅशिंग पत्रकार, लोकमतच्या वाळवा - शिराळा कार्यालयाचे प्रमुख अशोक पाटील यांच्याशी माझा गेल्या २७वर्षाचा दोस्तांना आहे. प्रत्येकाच्या सुख -दुःखाला धावून जाणारा हा फाटक्या तोंडाचा दिलदार माणूस!
माझ्या अँजिओग्राफी टेस्ट बद्दल समजताच बार्शीकडे धावला.बार्शीत येवून मला कडकडून मिठी मारायची एवढाच उद्देश! लोकमतच्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकण आवृत्त्यांचा मी संपादक असताना अशोक पाटलांच्या साथीने आम्ही अनेक विक्रम नोंदविले , काम एन्जॉय केले.
अशोक पाटलांच्या मिठीत त्या आठवणी दडल्या होत्या. असो बार्शीत माझ्या भेटी नंतर लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे, माझे मावस भाऊ आर्किटेक्ट व अभियंता अमित इंगोले यांनी पाटील व त्यांच्या सोबत असलेले पैलवान मानसिंह यांचा मुरलीधर चव्हाण परिवार आणि सौरभ यांच्या मिसळ कट्ट्यावर बाजार आमटी व बाजरी भाकरीच्या मेजवानीने पाहुणचार केला. यावेळी मुंबईस्थित आमचे बार्शीकर एबीपी माझाचे मयूर गलांडे, धनंजयराव मुंडे यांचे जनसंपर्क प्रमुख सौरभ खराडे व दिनेश मेटकरी हे पत्रकार मित्र आवर्जून उपस्थित होते.
ईश्वरपूर (इस्लामपूर) च्या अशोक पाटील यांची सद्भावना भेट.
|