बातम्या

अभ्यासात सातत्य हाच यशाचा मूलमंत्र : प्रा. गोपाळ गावडे

Gopal gavde


By nisha patil - 5/31/2025 7:34:44 PM
Share This News:



अभ्यासात सातत्य हाच यशाचा मूलमंत्र : प्रा. गोपाळ गावडे

सौ. आंबूबाई पाटील  स्कुलमध्ये दहावीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार


यशाला शॉर्टकट नसून अभ्यासात सातत्य हेच यशाचे खरे सूत्र असून विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केले पाहिजे असे प्रतिपादन महावीर महाविद्यालयाचे प्रा. गोपाळ गावडे यांनी केले. ते गोकुळशिरगाव (ता. करवीर )येथील सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी.के.पाटील होते. यावेळी ॲड. विजयकुमार कदम, सुनिल पाटील, भैरू केसरकर, दीपक पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी दहावीत या संपन्न केलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपले अनुभव अभ्यासाची पद्धत सांगितली. संस्थापक प्राचार्य के.डी.पाटील, टी. के. पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य तेजस पाटील, उपप्राचार्य निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, श्रेयस पाटील,शिक्षिका नंदा देसाई, शोभा पाटील, आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापका एस. के.पाटील यांनी मानले.


अभ्यासात सातत्य हाच यशाचा मूलमंत्र : प्रा. गोपाळ गावडे
Total Views: 108