बातम्या

प्रभाग 14 मधील गोठण गल्ली मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ*

Gothan galli


By nisha patil - 3/15/2026 5:22:17 PM
Share This News:



*प्रभाग 14 मधील गोठण गल्ली मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ*

**आजरा (हसन तकीलदार ) आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील गोठण गल्ली रस्त्याच्या कामाचे शुभारंभ नगरसेवक व व्यंकटराव शिक्षण समूहाचे सचिव अभिषेक शिंपी व मान्यवारांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

पालकमंत्री नाम. प्रकाश अबिटकर यांच्या मार्फत मंजूर करण्यात आलेल्या फंडातून गोठण गल्ली येथील मुख्य रस्त्याचे काम करण्यात येत आहे.

यावेळी नगरपांचायत गटनेते अभिषेक शिंपी यांनी प्रभागाच्या वतीने नाम.अबिटकर यांचे आभार मानले तसेच ठेकेदार रोहित भादवणकर यांना कामाच्या दर्जाबाबत सूचना केली आणि संपूर्ण गटार टू गटार चांगला रस्ता कारण्याबाबत सूचना दिल्या.

सदर कार्यक्रमास नगरपंचायत माजी नगरसेवक किरण कांबळे, नगरसेवक विक्रम पटेकर व प्रभागातील मान्यवर के.जी. पटेकर, बंडोपंत चव्हाण, बशीर दरवाजकर, विजय मोहिते, सुधीर नार्वेकर यांसह अनेक मान्यावर उपस्थितीत होते.


प्रभाग 14 मधील गोठण गल्ली मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ*
Total Views: 13