शैक्षणिक

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी 2026 निकाल जाहीर

Government Computer Typing Certificate Exam


By Administrator - 12/3/2026 12:52:51 PM
Share This News:



शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी 2026 निकाल जाहीर

कोल्हापूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जानेवारी 2026 मध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती. 30, 40 व 50 श.प्र.मि. विषयांची परीक्षा 5 ते 10 जानेवारी दरम्यान, तर मराठी व हिंदी 30, 40 श.प्र.मि. व इंग्रजी 60 श.प्र.मि. विषयांची परीक्षा 13 ते 17 जानेवारी दरम्यान पार पडली. या परीक्षेचा निकाल दिनांक 10 मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

संबंधित विद्यार्थी निकाल परिषदेच्या संकेतस्थळ www.mscepune.in येथे पाहू शकतात आणि गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेऊ शकतात. प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीसह संबंधित संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध केली जातील. 

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत संस्थेतून ऑनलाईन अर्ज करावा लागेल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 100 रु. तर छायाप्रतीसाठी 400 रु. ऑनलाईन भरावेत. पुनर्मूल्यांकनासाठी प्रती विषय 600 रु. ऑनलाईन भरून अर्ज करावा लागेल.

निकालाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे-  30 श.प्र.मि.- इंग्रजी- 62.69 %, मराठी- 40.21 %, हिंदी- 68.89 %
40 श.प्र.मि.- इंग्रजी- 51.66 %, मराठी- 36.64 %, हिंदी- 45.83 % अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी दिली आहे.


शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी 2026 निकाल जाहीर
Total Views: 14