बातम्या

“शासकीय इमारतच धुळीच्या गर्तेत; नागरिकांना त्रास”

Government building itself is in a dusty state


By nisha patil - 9/23/2025 5:59:55 PM
Share This News:



“शासकीय इमारतच धुळीच्या गर्तेत; नागरिकांना त्रास”

कोल्हापूर – शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना, शहरातील कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतच स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन अवस्थेत आढळली आहे. इमारतीच्या आत ठिकठिकाणी मावा, गुटख्याचे डाग आणि धुळीच्या थरामुळे नागरिकांना प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या इमारतीत १५ हून अधिक शासकीय कार्यालये तसेच सहकार न्यायालय आहे. दररोज शेकडो नागरिकांची ये–जा होत असते, तरी इमारतीत प्रवेश करताच सर्वत्र कचरा, धुळीचे थर आणि निरुपयोगी फर्निचर दिसून येत आहेत. तसेच पाण्याची कमतरता असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी या स्थितीबाबत प्रशासनाकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सरकारी इमारतीचा दर्जा सुधारला जाऊ शकेल.


“शासकीय इमारतच धुळीच्या गर्तेत; नागरिकांना त्रास”
Total Views: 107