बातम्या

मराठा–कुणबी दाखल्यांवरून सरकारची डोकेदुखी वाढली; पंकजा मुंडे आक्रमक, श्वेतपत्रिकेची मागणी

Governments headache increased due to Maratha

By nisha patil - 11/9/2025 4:49:02 PM
Share This News:

मराठा–कुणबी दाखल्यांवरून सरकारची डोकेदुखी वाढली; पंकजा मुंडे आक्रमक, श्वेतपत्रिकेची मागणी

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआर काढला. मात्र या निर्णयामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. छगन भुजबळ यानंतर आता पर्यावरणमंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेही या प्रश्नावर आक्रमक झाल्या आहेत.

ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत त्यांनी आतापर्यंत दिलेल्या सर्व कुणबी दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सरकारने या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकीच्या नोंदींवर आधारित दाखले कुणालाही देऊ नयेत, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

मराठा–कुणबी दाखल्यांवरून सरकारची डोकेदुखी वाढली; पंकजा मुंडे आक्रमक, श्वेतपत्रिकेची मागणी
Total Views: 105