बातम्या
दिवाळीपूर्वी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 19 जिल्ह्यांतील रेशनधारकांना गव्हाऐवजी ज्वारीचा पुरवठा
By nisha patil - 10/13/2025 1:04:19 PM
Share This News:
मुंबई :- दिवाळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 19 जिल्ह्यांतील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या गव्हाच्या प्रमाणात कपात करून त्याऐवजी ज्वारीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरवठा विभागाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “दिवाळीत गव्हाच्या भाकरीऐवजी आता ज्वारीची भाकरी खावी लागणार का?” असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
मागील हंगामात सरकारने मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी केली होती. त्यामुळेच दिवाळीपूर्वी राज्यातील 19 जिल्ह्यांमधील शिधापत्रिकाधारकांना गहू कमी करून ज्वारीचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवीन धान्यवाटप रचना :
🔸 अंत्योदय योजनेतील लाभार्थी :
-
20 किलो तांदूळ
-
7.5 किलो गहू
-
7.5 किलो ज्वारी
🔸 प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी :
पूर्वी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू दिला जात होता, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळत होता.
या 19 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना मिळणार गव्हासोबत ज्वारी :
हिंगोली • बुलढाणा • अकोला • जळगाव • नांदेड • परभणी • बीड • धाराशिव • अहिल्यानगर • लातूर • सोलापूर • पुणे • सातारा • सांगली • वर्धा • नागपूर • संभाजीनगर • नाशिक • नंदुरबार
दिवाळीपूर्वी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 19 जिल्ह्यांतील रेशनधारकांना गव्हाऐवजी ज्वारीचा पुरवठा
|