बातम्या

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएतर्फे उमेदवारी जाहीर

Governor C P Radhakrishnan s

By nisha patil - 8/18/2025 2:54:30 PM
Share This News:

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएतर्फे उमेदवारी जाहीर

कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल  सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीएतर्फे उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मा. राधाकृष्णन यांनी सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांचा अनुभव व संवेदनशील दृष्टिकोन देशाच्या विकासात व संसदीय परंपरेच्या बळकटीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

त्यांचा अनुभव, अभ्यास आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर कार्य करताना निश्चितच उपयुक्त ठरेल. "जनसुराज्य शक्ती" पक्षाच्या वतीने मा. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएतर्फे उमेदवारी जाहीर
Total Views: 59