बातम्या
कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर
By nisha patil - 1/29/2025 12:37:43 PM
Share This News:
कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर
अहिल्यानगर: शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा 'कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार' यावर्षी शाहूनगरी कोल्हापूरचे लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी व राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी दिली.
डॉ. सुनीलकुमार सरनाईक हे शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातून पीएचडी प्राप्त असून, गेली ३० वर्षे ते करवीर काशी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत आणि त्यांना केंद्र सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार कै. ग.गो. राजाध्यक्ष पुरस्कार, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सरनाईक हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी असून, त्यांचा पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांसाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.
या पुरस्काराने यापूर्वी अर्शदभाई शेख, कॉ. आनंद वायकर, डॉ. शेषराव पठाडे, कॉ. का.वा. शिरसाठ, कॉ. श्रीधर आदिक आणि कॉ. नारायण गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर
|