बातम्या

दत्तवाडमध्ये पदवीधर मतदान शांततेत पार; शिक्षक मतदारसंघात १०० टक्के मतदान

Graduate voting in Dattawad concludes peacefully


By nisha patil - 10/23/2026 10:27:34 PM
Share This News:



दत्तवाडमध्ये पदवीधर मतदान शांततेत पार; शिक्षक मतदारसंघात १०० टक्के मतदान
 

दत्तवाड प्रतिनिधी : आचिन हेरवाडे दत्तवाड : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी दत्तवाड येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. गावातील तीन मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. शिक्षक मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले, तर पदवीधर मतदारसंघात ६२.५५ टक्के मतदानाची नोंद झाली.
 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या बूथ क्रमांक ६०२ वर एकूण ५८२ मतदारांपैकी ३६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ६१.८६ टक्के मतदान झाले. बूथ क्रमांक ६०३ वर एकूण ४०६ मतदारांपैकी २५८ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ६३.५५ टक्के मतदानाची नोंद झाली. या दोन्ही केंद्रांवर मिळून ९८८ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी मतदान केले.
 

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या बूथ क्रमांक २६६ वर एकूण ८८ मतदारांपैकी दोन मतदार दुबार नोंदणीमुळे मतदान करू शकले नाहीत. त्यामुळे मतदानासाठी पात्र असलेल्या ८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परिणामी, पात्र मतदारांचे १०० टक्के मतदान झाले.
 

शिक्षक मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला. पदवीधर मतदारसंघातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील तसेच हेड कॉन्स्टेबल कराडे यांनी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाच्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.


दत्तवाडमध्ये पदवीधर मतदान शांततेत पार; शिक्षक मतदारसंघात १०० टक्के मतदान
Total Views: 24