बातम्या

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुका तर्फे ग्राहक जागरण मास निमित्त मार्गदर्शन

Grahak panchait Aajra


By nisha patil - 10/1/2026 10:46:01 PM
Share This News:



अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुका तर्फे ग्राहक जागरण मास निमित्त मार्गदर्शन

आजरा (हसन तकीलदार ):-24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण मास अंतर्गत मार्गदर्शन दि. 8 जानेवारी 2026रोजी आजरा महाविद्यालय आजारा येथे मार्गदर्शन करण्यासाठी प्रसादजी बुरांडे,

(प्रांत कार्यकारीणी सदस्य,अखिल भारतीय ग्राहक पंचायत,मध्य महाराष्ट्र प्रांत),

 संदीप जंगम

(प्रांत संघटन मंत्री,अखिल भारतीय ग्राहक पंचायत,मध्य महाराष्ट्र प्रांत),

जगन्नाथ जोशी(जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत),रमेश पाटील (उपाध्यक्ष

अखिल भारतीय ग्राहक पंचायत,कोल्हापूर), रामदास चव्हाण( जिल्हा कार्यकारणी सदस्य), गुंडू परीट (तालुकाध्यक्ष आजरा ),उपाध्यक्ष देविदास सूर्यवंशी,सचिव मंगेश पोतनीस,महिला तालुकाध्यक्ष राजश्री सावंत मॅडम आजरा महाविद्यालय येथे उपस्थित होत्या.

 त्यानंतर येरंडोळ ता.आजरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुक्याच्या वतीने आयोजित ग्राहक जागरण मास अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयी व्याख्यान येरंडोळ येथील ग्रामपंचायत मधील सभागृहात आयोजित केले होते.

 अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे सदस्य संदिप जंगम यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शिंदे सर यांनी स्वागत केले.या वेळी जिल्हा अध्यक्ष जग्गनाथ जोशी, तालुका अध्यक्ष गुंडू परीट,तालुका सचिव मंगेश पोतनीस,येरंडोळ सरपंच सौ. सरिता पाटील,उपसरपंच भीमराव माधव, ग्रामसेविका सौ. गुरव मॅडम, संतोष ढोणूक्षे व मराठी शाळा मुख्याध्यापक नेवरेकर सर, कवठणकर सर,ग्रामपंचायत कर्मचारी. गावचे नागरिक उपस्थित होते .आभार शिंदे सर यांनी मानले.


अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुका तर्फे ग्राहक जागरण मास निमित्त मार्गदर्शन
Total Views: 337