बातम्या
ग्रामपंचायत सदस्याची पत्नी फरार... प्रियकराची तीन लाखाची मागणी
By nisha patil - 6/19/2025 7:02:30 PM
Share This News:
ग्रामपंचायत सदस्याची पत्नी फरार... प्रियकराची तीन लाखाची मागणी
प्रियकर म्हणतो – पैसे द्या, बायको घ्या!
राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते व रांगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य लखन बेनाडे यांची पत्नी लक्ष्मी हिने त्यांची आर्थिक फसवणूक करत दागिन्यांसह ८ लाख रुपये हडपले आणि आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. विशेष म्हणजे, तिच्या प्रियकरानेच "पत्नी परत हवी असेल, तर ३ लाख रुपये द्या" अशी मागणी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये त्यांची ओळख लक्ष्मी लोंढे हिच्याशी झाली. मात्र लक्ष्मीचे आधीपासून विशाल गस्ते या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यांच्यात भांडण झाल्यानंतर लक्ष्मीने लखनसोबत लग्नाचा बनाव केला आणि २०२४ मध्ये दोघांचे विवाह झाले.
लग्नानंतर लक्ष्मीने वेगवेगळ्या कारणांनी लखनकडून वेळोवेळी पैसे घेतले. एकूण ८ लाखांहून अधिक रक्कम घेतल्यानंतर, घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन ती विशालसोबत पुन्हा फरार झाली.
फिर्यादीनंतर पोलिसांनी लक्ष्मी आणि विशालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, बेनाडे यांनी तक्रार दिल्यानंतर लक्ष्मीने पोलिस ठाण्याबाहेरूनच व्हिडीओ करून नवऱ्याला धमकावल्याचेही सांगितले जात आहे.
ग्रामपंचायत सदस्याची पत्नी फरार... प्रियकराची तीन लाखाची मागणी
|