बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये शाही दसरा महोत्सव साजरा.            

Grand Dussehra festival celebrated at Vyankatrao Shikshan Sankul


By nisha patil - 10/13/2026 7:36:57 PM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये शाही दसरा महोत्सव साजरा.            

*आजरा(हसन तकीलदार)*:-व्यंकटराव हायस्कूल ,ज्युनिअर कॉलेज व प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ,"शाही दसरा महोत्सव" व "पारंपारिक वेशभूषा" कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला. या दिनानिमित्त ज्युनियर कॉलेज यांचे मार्फत विद्यार्थीनींनी शाळेत भव्य फुल सजावट करून मैदानात

*शाही दसरा*असे लिहून त्यावर आरास सजवण्यात आले. प्राचार्य संजयकुमार पाटील व पर्यवेक्षिका व्हि.जे.शेलार यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक  आर.व्ही.देसाई, ज्युनिअर विभाग प्रमुख एम.ए.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एन.ए मोरे, सौ. एस. डी.इलगे, एस.टी.पाटील,  एम.एस.पाटील उपस्थित होते 
   

पारंपारिक वेशभूषा व कला शाळेतील विद्यार्थ्यांनी  सादर केल्या. सकाळच्या सत्रात ज्युनिअर  कॉलेज विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी कार्यक्रमाचे नियोजन  केले प्रार्थना परिपाठानंतर हायस्कूल मधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पारंपारिक वेशभूषेत येऊन त्यांनी  विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने आकर्षक अशा वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक आर्.व्ही.देसाई व त्यांचा स्टाफ यांनी नियोजन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका उपस्थित होते.
    शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या परिपत्रकानुसार राबविण्यात आलेल्या व्यंकटराव शिक्षण संकुलातील या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष  जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ तसेच तहसील कार्यालयातील पदाधिकारी व शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी यांनी कौतुक केले.


व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये शाही दसरा महोत्सव साजरा.            
Total Views: 86