बातम्या
शेंडूर येथे जय शिवराय तरुण मंडळाचा भव्य पावनखिंड देखावा साकार
By nisha patil - 9/19/2026 8:02:47 PM
Share This News:
शेंडूर येथे जय शिवराय तरुण मंडळाचा भव्य पावनखिंड देखावा साकार
कागल प्रतिनिधी - अजित बोडके शेंडूर ता. कागल : शेंडूर येथील जय शिवराय तरुण मंडळाच्या वतीने यंदा इतिहासाची साक्ष देणारा भव्य पावनखिंडचा देखावा साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील शौर्याचे प्रतीक असलेल्या पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची गाथा या देखाव्यातून जिवंत करण्यात आली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कलात्मकतेने हा देखावा उभारला असून, पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. विशेषतः तरुण पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने हा देखावा साकारल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुशांत माने, उपाध्यक्ष शुभम बावचे, सचिव महादेव कवडे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत असून, शेंडूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
शेंडूर येथे जय शिवराय तरुण मंडळाचा भव्य पावनखिंड देखावा साकार
|