बातम्या

*आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न*

Grand Rangoli competition held with great enthusiasm


By nisha patil - 11/11/2026 5:40:52 PM
Share This News:



*आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न*
 

*लता कुंभार ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी
 

*आजरा(हसन तकीलदार):-दिवाळी सणाच्या निमित्ताने आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ ('नारी शक्ती' वॉर्ड) मध्ये नगरसेवक परशुराम बामणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भव्य रांगोळी स्पर्धेचा' निकाल नुकताच जाहीर झाला असून, पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साही व दिमाखदार वातावरणात पार पडले . या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट आणि कल्पक कलाकृतीच्या जोरावर सौ. लता प्रसाद कुंभार यांनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.  
 

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक नगरसेवक  परशुराम बामणे यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली व प्रभागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पारंपरिक सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे बक्षीस वितरणास सुरुवात झाली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक प्रमुख पाहुण्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांच्या हस्ते सौ. लता प्रसाद कुंभार यांना प्रदान करण्यात आले.
​या रांगोळी स्पर्धेत 

 

​प्रथम क्रमांक लता प्रसाद कुंभार  पटकावला तर ​द्वितीय क्रमांक समीक्षा सावरतकर,​तृतीय क्रमांक  पल्लवी कुंभार ,​चतुर्थ क्रमांक  प्रगती सुतार  आणि ​पाचवा क्रमांक विशाखा सोनार  यांनी पटकावला.
​विजेत्यांना आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सर्व महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. स्पर्धेचे अत्यंत काटेकोर, निःपक्ष व पारदर्शक परीक्षण बाळासाहेब धोंडीबा रक्ताडे व के. ए. दावणे यांनी केले.  
​कार्यक्रमाचे उत्कृष्ट मंडप व आकर्षक डेकोरेशन अमित ढवळ यांनी केले होते. रवळनाथ कॉलनीचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्याने आणि चोख नियोजनामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व देखण्या स्वरूपात पार पडला.

 

​या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आजरा नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, परेश पोतदार, बाळ केसरकर, पांडुरंग सावरकर, अनिल पाटील,जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, धडाम, शिवाजी खरुडे, रवींद्र कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या यशस्वी व देखण्या आयोजनाबद्दल प्रभागातील सर्व स्तरांतून विजेत्यांचे, सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजक नगरसेवक परशुराम बामणे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.


*आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न*
Total Views: 122